STORYMIRROR

Suvarna Patukale

Romance

3  

Suvarna Patukale

Romance

शांत मानसी

शांत मानसी

1 min
240

शांत मानसी विहरत येती,

मधुर तुझ्या आठवणी

आज पोहोचते गतकाळातील

हरवून गेल्या क्षणी

कधी दिसशी तू, मज हसताना

कधी दिसशी तू, मज रूसताना

क्षणात उडते पाखरू जैसे

निळसर गगनातूनी

आज पोहोचते गतकाळातील

हरवून गेल्या क्षणी

हात हातीचा तू सोडविता

नयनात दाटते का ही सरिता

वाहू लागतो गहिवर,

त्या ओघळत्या थेंबातूनी

आज पोहोचते गतकाळातील

हरवून गेल्या क्षणी

त्या वाटेवरती मन घुटमळते

प्रत्येक खूण ती अशी दरवळते

सख्या तुझे प्रतिबिंब खुणवते

कधी आरशातूनी

आज पोहोचते गतकाळातील

हरवून गेल्या क्षणी

तू जीवन माझे आस ही तू

तू तनमन माझे अन्

श्वास ही तू

तुज पहात असते

आकाशातील चंद्र तारकातूनी

आज पोहोचते गतकाळातील

हरवून गेल्या क्षणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance