पहिला पाऊस
पहिला पाऊस
रिम झिम रिम झिम
पहिला पावसाच्या सरी...
मातीच्या सुगंधात
निनाद दिशांतरी
झाली ओलेचींब
तापलेली उष्ण धरा
आनंदुनी आसमंत
भिरभिनारा गार वारा
झाली तृप्त जीव
वर्षाव करी वर्षाराणी
पाय वाटा थांबूनी बघ जरा
हे मना सृष्ठी साजीरी.
अलवार स्पर्शात
रमणीय निसर्गात
घेवुन आल्या कोमल सरी
विश्वास या थेंबात
झर झर वनात, हिरवा छटा
स्पंदने ह्रदयात ,नृत्य अभाळात
संदेश प्रेमाचा लपेटत
पाने फुले संगे मोर डोलतात...

