आई घरी नसल्यावर
आई घरी नसल्यावर
आई तुझे लेकरू
तू नसल्यावर वाट पाही
कासावीस जीव होई
लक्ष नसे कशात राही उपाशी...
कुशीत तूझ्या स्वतःला विसरावे
आई येना आई येना
मला वाटे सोपे जगणे
शब्द मला कुठले सुचेना
अश्रु झाले अनावर,
घरात आता नाही करमत ,
खरचं घराला घरपण नाही,
तुझ्या सोबत मी आहे सहमत..
कसे होइल माझे,
आता मला कळेना,
स्वप्नात असे घडू नये,
आठवणींचा डोंगर सरेना...
