STORYMIRROR

CHITTARANJAN CHAURE

Romance

3  

CHITTARANJAN CHAURE

Romance

प्रियदर्शनी

प्रियदर्शनी

1 min
190

(स्वर : दिसते मजला सुख चित्र नवे)

*फुलता हासता चांदणी पाझळे ,*

*हे पुष्प म्हणु की सौंदर्यमळे.*


*रागिणी ही प्रभात समयी,*

*छेडीतो कुणी बासरी.*

*सप्तरंगी उमलुन आली,*

*सुर्यकिरणांची माधुरी .*

*मन निर्मोही,तन वैदेही,*

*भाव अबोलीचे कुणा कळे.*

*फुलता हासता चांदणी पाझळे*

*हे पुष्प म्हणु की सौंदर्यमळे.*


*प्रीत वसे निरागस नयनी,*

*करुणा जसी शुद्धमनी,*

*शांत स्वभावी निखळ झरणा,*

*मुक्त वाहे नित आचरणी.*

*प्रियदर्शनी,मनमोहीनी,*

*चित्त मांगल्याचे ही मुक्ताफळे.*

*फुलता हासता चांदणी पाझळे,*

*हे पुष्प म्हणू की सौंदर्यमळे.* 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance