आई
आई
वात्सल्य माऊलीचे पाहून कुण्या ठायी ,
अंतरात शोक होतो मजलाच नाही आई.
स्मरता तुझी मूर्ती काहीच आठवेना,
द्रृष्टिपथात दुरवर चेहराही साठवेना.
गहीवरल्या हुंदक्यात व्याकुळ जीव होई .
अंतरात शोक होतो मजलाच नाही आई .
बेटा म्हणुन कोणी ममतेने फेरी हात,
चेहऱ्यात तिच्या दिसते आई माझी साक्षात.
करूणेचे जरी धागे आईची सरं नाही,
अंतरात शोक होतो मजलाच नाही आई.
अक्षम्य चुका घडो दुधावरची साय असते,
क्षमा करुनी पदरात लपवणारी माय असते.
उपकार तिचे आजन्म फेडणे शक्य नाही,
अंतरात शोक होतो मजलाच नाही आई.
ऐश्वर्य असो कितीही दिवस जरी सुखाचे,
आईविना हे वैभव बेकामी अन् फुकाचे.
व्यथित रत्नरंजन नाही आईशिवाय काही.
अंतरात शोक होतो मजलाच नाही आई .
