STORYMIRROR

CHITTARANJAN CHAURE

Others

3  

CHITTARANJAN CHAURE

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
282

*धुंद मनी मस्तीचा जोश अंगी वादळी,*

*पहिल्या पावसात भिजण्याची, मजाच काही वेगळी.*


*बेधुंद पाऊसधारा, मदनाशी करी चाळा,*

*मंद सरीचा इशारा मनी आनतो उमाळा.*

*तनबदन करी चिंब ही निसर्ग रीत आगळी.*

*पहिल्या पावसात भिजन्याची मजाच काही वेगळी.*


*माहोल मदहोश करी हा माटीचा सुगंध,*

*पाने फुले वृक्षवल्ली सारेच झाले धुन्द.*

*ठेक्यावरी ताल धरी निर्गुळी पण नागडी.*

*पहिल्या पावसात भिजण्याची मजाच काही वेगळी .*


*बागेत फुलपाखरांना नवे वेध लागले,*

*घुंघटात कळ्यांच्या भविष्य शोधु लागले .*

*उमले नवी पाकळी ,बाहेर हवा मोकळी .*

*पहिल्या पावसात भिजण्याची मजाच काही वेगळी .*


*कवेत घेण्या धरनीला इंद्रधनु वाकला .*

*डोळे मिटुन वसुंधेने हिरवा शालू झाकला.*

*चित्त मनी डोकावली निसर्गाची ही हेकडी.*

*पहिल्या पावसात भिजण्याची मजाच काही वेगळी.*


Rate this content
Log in