आषाढ
आषाढ
1 min
167
मेघांची झाली गर्दी
आले ओथंबून आभाळ,
सृष्टीचे फुलले मनं
येता आषाढाचे घनं.
कोमेजल्या पानकळ्या,
नवतेजाने ऊमलल्या.
गंध हृदयात दाटता
सप्तरंगात रंगल्या.
ओल्या मातीत सांडता
बीज अंकुरे साजरे,
फुल होतांना कळ्यांचे
भाव मनातं लाजर
जोमात आल्या खारी
आता चिखलाची घाई,
धान रोपण कराया
चला वन्यारणी बाई.
उन पावसाच्या झळीत
तनं मोऱ्यात झाकला,
वनं राबता राबता
अंग चिखलानं माखला.
असा पडला आषाढ
धरणे भरले तुडूंब,
जीवनदायी जलराशी
जणू अमृताचे कुंभ.
पंढरीत वारकरी,
करी विठुचा गजर ,
गुरूपौर्णिमा बुद्धाची
करूणा साऱ्या विश्वावर.
