STORYMIRROR

Dr.Riddhi Jadhav

Inspirational

3  

Dr.Riddhi Jadhav

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
183

स्त्री" हा शब्दच जणू पटवून देई त्या उज्ज्वल व्यक्तिमत्वाची ओळख;

प्रखर ज्योत बनून स्वतः जळते, पण दूर सारे भवतालचा काळोख!


स्त्री म्हणजे नाही कोणी रूपवान, दुसऱ्यांनी नटवलेली परी;

स्त्री म्हणजे एका क्षणात अन्यायाची राख करेल अशी भडकलेली चिंगारी!!!


स्त्री म्हणजे नाही कोणी मिठू मिठू बोलणारा पोपट किंवा कोकिळेचे मधुर गान;

स्त्री म्हणजे असा रुतबा, ज्यापुढे समाजाची अदबीने झुकलेली असावी मान!!


स्त्री म्हणजे नाही तुझ्या हक्काची बाहुली, की तिच्या शरीराचा तू करावा पाचोळा;

स्त्री म्हणजे शिवाचे ते रूप, जेव्हा नीलकंठ उघडी तिसरा डोळा!!


आणि हो मित्रांनो स्त्री म्हणजे नाही फक्त आईबाबांची लाडकी राजकुमारी,

ती एक इतिहास आहे, जशी शिवरायांची दुष्मनावर निघालेली प्रत्येक तुफानी स्वारी....

प्रत्येक तुफानी स्वारी!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational