STORYMIRROR

Dr.Riddhi Jadhav

Romance

3  

Dr.Riddhi Jadhav

Romance

विरह

विरह

2 mins
308

जिच्या समवे तू चालत होतास आयुष्याची एकच वाट;

आज त्या विशाल समुद्राने का दूर सारली त्याच्यातलीच एक लाट??

जिचा नाजूक हात तुझ्या राकट हातात विसावे;

आज तिने जगापासून दूर एका कोनाड्यात का दिसावे?

जिला निजाव्यास असे तुझी उबदार बाजूंची कुशी;

आज तिच्या आसवांचा महासागर कसा सामावून घेईल ती मऊ उशी?

तिचे नयन म्हणजे तुझ्या प्रति असलेल्या भावनांचा डोह;

आता अशा भावनाहीन सुन्न डोळ्यांचा कशाला कोणास होईल मोह?

जिच्या प्रेमळ नजरेत तू नेहमी मूर्तीरुपी दिसावा;

आज तिला तुला डोळेभरून पाहण्याचा हक्क का नसावा?

जिच्या खळखळणाऱ्या हास्याचे असायचास तू गोड गुपीत;

आज त्या दातांच्या रांगा का लपून बसल्या ओठांच्या कुपीत?

जिच्यासाठी तुझी सोबत करीत असे ठेंगणे हे निळसर आभाळ;

आज तिच्या सुखाने का धरले असावे काळोखी पाताळ?

जिचे आयुष्य तुझ्या बाहुपाशात करत असे चिंब, इंद्रधनुचे रंग हे सप्त;

आज तुझ्या विरहाने का झाली तिची ही सुबक काया काळया सावटीत लुप्त?

पण तुझा हा विरह होता तुमच्या एकत्रित उज्ज्वल भवितव्यासाठी;

म्हणून त्याचे दुःख बाजूला सारून ती उभी राहिली तुझ्या निर्णयापाठी!

तुझा हा विरह करत असे प्रत्येक क्षणी तिचे काळीज घायाळ!

पण तिच्या भक्कम आधाराने, उद्या फुलणार तुझ्यासारख्या साहसी सिंहाची आयाळ!

आज तिचे हे छोटे हृदय तुझ्या प्रेमाच्या वसंताला काही काळासाठी मुकणार;

पण उद्या तुमच्या अभिमानापुढे, या रयतेची ताठ मान अदबीने झुकणार!

तिच्या गोबऱ्या गालाला राहील तुझ्या हळुवार स्पर्शाची वेडी आस;

पण आज या चित्ताच्या पेटलेल्या वणव्याने धरला आहे एक नवा ध्यास!

नक्कीच या विरहाच्या ज्वालेत होरपळणाऱ आहेत कोवळी पाखरे ही मनीची;

पण उद्या तिच्या मस्तकाला निजायला उररुपी उशी असेल तिच्या धनीची!

तिच्या या जीवनाच्या काळया पुठ्यावर पुन्हा एकदा सजू दे रे सख्या, रंग हे लक्ष ;

आणि हा हृदय हेलावणारा विरहसुद्धा देऊ दे या भूतलाला तुमच्या अमर प्रेमाची साक्ष...

तुमच्या अमर प्रेमाची साक्ष!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance