STORYMIRROR

अन्वय मुक्तेय

Romance Inspirational

3  

अन्वय मुक्तेय

Romance Inspirational

संगम प्रेमाचा...

संगम प्रेमाचा...

1 min
256

तू भेट सांजवेळी, माझ्या मना जराशी ..


रंगवू स्वप्न उद्याचे, होऊन एक बाहुपाशी ..


निजले झाड वेली, निजली फुल पाने ..


चमकताय चार दिव्याचे, दोन रातदिवाने ..


ओठ फुल गुलाबाचे, चाखतोय गुलकंद ..


सावळा ओढुन शेला, चोरतोय मकरंद ..


गुंतला जीव ऐसा, भान ना तमाचे ..


स्पंदनाची विन झाली, कान ना जगाचे ..


लीन तुझ्यात ऐसा, एकरूप दिशादाही ..


संगम प्रेमाचा, तो चंद्र चोरून पाही ..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance