माझा देश...
माझा देश...
स्वर्गाहुन सुंदर माझा देश,
विविधतेने मनोहर माझा देश..
लावितो टिळा या मातीचा,
प्राणाहुन प्यारा माझा देश..
धर्म, वंश, पंथ,अनेक,
तरी एक माझा देश..
मी, घर, कुटुंब, गाव,
या हुनआधी माझा देश..
गर्व असे मज या भूमीचा,
रंजीत इतिहासाचा माझा देश..
गांधीजींचा,भगतसिंगाचा,
शहीदांचा माझा देश..
भाग्य अमुचे सांगतो आम्ही,
भारत भूमी माझा देश..
शिवरायांचा, शंभुरायांचा,
स्वराज्य माझा देश..