बालपण
बालपण
आभाळचं छप्पर करून,
मिळेल ते खाऊन जगणारं, बालपण पाहतो तेव्हा..
स्वतःच्या जगण्याची तेवढ्यापुरती तरी,
लाज आजही वाटते...
नजरेत पडणारी चिमुकली पोर सिग्नलवर बालपण विकते तेव्हा,
खिशाकडे हात नेत ते बालपण आपण विकत घ्यावं का?
असा प्रश्न, अंशतः मन हेलावून आजही टाकतो..
निःस्वार्थ, निष्पाप डोळे हात लांबवून जेव्हा,
भूक लागली पैसे द्या ना,
असे पैसे मागतात तेव्हा.
पोटातली भूक गळून पडावी,
इतकं काळीज व्याकुळ आजही होते..
हे बालपण कोणी दया दाखवून, गरज नसताना विकत घेईलही..
पण..
तेच बालपण वाटेल ती किंमत देवून पुन्हा परत मिळवता येईल असे आजही वाटतं नाही...
