करुणा यात्रा
करुणा यात्रा


लिहू या म्हणतो या निर्वासितांची पायपीट,
हातावरचे पोट आणि जगण्याची धडपड..
मैलोन् मैल न संपणारा प्रवास,
जाणिवेचे आणि वेदनेचे गाऱ्हाणे,
आयुष्याला पुरून उरेल इतका थरारक जीवनकथा...
पश्चिमरंगी आभाळाची तमा न बाळगता,
आपल्या घरट्याला निघालेले फिनिक्स पक्षांचे थवे..
भुकेची,
पोटाची खळगी भरो न भरो पण,
मनाची पोकळी भरायलाच हवी..
त्यासाठी,
घर जवळ करायला सुरु केलेली "करुणा यात्रा"...
तुफानाला ही थांब म्हणणारी अदम्य इच्छाशक्ती,
ng> वादळातही वाट शोधून, भाळी लावलेली जन्मभूमीची माती, आणि सूर्याशी ही स्पर्धा करून, कोवळ्या पणत्या सवे ही स्पर्धा, एकहाती जिंकलेल्या दिव्याचे दिव्य मनोगत.. तळपायाचे लोबलेले चांबडे, आणि तान्ह्या पायात येणाऱ्या गाठी.. मरनही जिवंत रहावं म्हणून, चाललेली कधी न संपणारी पाऊलवाट.. यांनी स्वप्नच पहायची नाही का? आज सोडलेल्या स्वप्ननगरीत, उद्या हे पुन्हा आश्रितच होणार.. जगणार... आणि मरणारही...