कितीदा नव्याने...
कितीदा नव्याने...
1 min
275
कितीदा नव्याने तुला आठवावे,
स्मरणांचे निरोप का एकट्यानेच पाठवावे..
किती साक्ष देऊ मी प्रेमात माझी,
किती वचने भुलावी तु प्रेमात तुझी,
किती तपांचा हा होई दुरावा,
किती अंतरी तु घेई विसावा..
का श्वास पाही असा अंत माझा,
विरहाचे देणे देह जिवंत माझा..
आता तरी जगण्याचे कारण पाठवावे..
विनाकारण सरणाला मी किती थांबवावे...
कितीदा नव्याने तुला आठवावे,
स्मरणांचे निरोप का एकट्यानेच पाठवावे..
