STORYMIRROR

अन्वय मुक्तेय

Romance

3  

अन्वय मुक्तेय

Romance

हे मन बावरे...

हे मन बावरे...

1 min
12K

मी उत्तर देऊ शकणार नाही,

तू असे प्रश्न विचारू नको..

सांजवेळ जवळ आल्यावर,

मला थांबायला सांगू नको..


तीन ही प्रहर जवळ असूनही,

हृदयात नसल्याचे बोलू नको..

कळत शब्दांचे मोह सापळून,

सांजवेळी मला अडकवू नको..


उद्याची तुला वचनं देऊ शकतो,

तू आजची शाश्‍वती मागू नको..

रोज निघेना पाय माझा त्यातच तू,

मनात रातराणी माळू नको..


असे कसे हे काहीतरी घडतंय,

तू त्यात स्वतःला पाहू नको..

माझ्या स्वप्नांना किनार वेदनेची,

तू वेदनेची कहाणी होऊ नको..


किती हसरं जग आहे तुझं,

तू रडण्याला निमंत्रण देऊ नको..

दुःखाच्या सरीचे तुला वेड लागायला,

'हे मन बावरे' तू होऊ देऊ नको..


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance