STORYMIRROR

अन्वय मुक्तेय

Romance Inspirational Others

3  

अन्वय मुक्तेय

Romance Inspirational Others

ओढ पावसाची...

ओढ पावसाची...

1 min
66

तुझ्याविना एकटा भिजताना, झुरतो पाऊसही..

ओल्या पापण्यात झुलताना, स्मरतो पाऊसही..


अबोल तू मजसाठी, त्यालाही हे कळतंय..

तळहातावर थेंब झेलताना, बोलतो पाऊसही..


निःशब्द हा दुरावा, साहतो तोही माझ्यासवे..

तुझ्या विरहाचे गाणे गाताना, रडतो पाऊसही..


जोडी पाखरांची भिजताना, भिजतात डोळे माझेही..

एकटे मला भिजवताना, छळतो पाऊसही..


ओढ पावसाची, तरीही विझेना अंतरी.. 

अंतरीचे दिवे तेवताना, जळतो पाऊसही..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance