असा पाऊस असावा
असा पाऊस असावा


असा पाऊस असावा, असा पाऊस असावा
प्रिये मीलनाचा, असा पाऊस असावा
मुक्त होऊन आपण, फिरावे फिरावे
एकांत पाहुनी मग, बिलगून जावे
प्रीतीस आणण्यास, ओला रुसावा
गुलाबी गुलाबी पाऊस असावा
असा पाऊस असावा, असा पाऊस असावा
प्रिये मीलनाचा, असा पाऊस असावा
रोज मनाला तुझे, भास होती जिथे
रंगवावे तुला, जलथेंबांनी तिथे
तुझ्या सुगंधाचा, देण्या फुलांना गिलावा
मऊ रेशमाचा, पाऊस असावा
असा पाऊस असावा, असा पाऊस असावा
प्रिये मीलनाचा, असा पाऊस असावा