सांग ना कस जगायचं?
सांग ना कस जगायचं?
तुझ्यासोबत जगायचं....की अबोल मी व्हायचं....
भावनेत वहायच आपुल्या....की स्तब्ध दगड व्हायचं....
शब्द तुझे नी माझे...रचत कविता व्हायचं....की..
पूर्णविराम होऊन....सर्व अधोगतीत न्यायचं....
स्वप्न तुझी वाचून.... रेखाटत चित्र व्हायचं....की
मन गुंढाळुन सगळं...गोठून शाईत जायचं....
चिंब चिंब पाऊस सरींत....आठवण मी व्हायचं...की
मातीच्या दरवळीत....सहजच वाहून जायचं....
हात तुझा धरताना ....नवं फांदी मी व्हायचं....
की पिकलेल्या पाणासवे...गळून मी जायचं....
तुझ्या हसण्यातील.... नवचैतन्य मी व्हायचं....की
दाटलेल्या भावनेतून गालांवरून वहायच...
थिजलेल्या डोळ्यांत तुझ्या.... स्वप्न मी व्हायचं......
की जगण्याच्या उमेदित तुझ्या...श्वासांच प्राण द्यायचं.....

