त्याच सुगंधाची याद आज आहे...
त्याच सुगंधाची याद आज आहे...
केशसंभाराचा रेशमी तो स्पर्श
स्पर्शिता तनूला होतो मज हर्ष
गौरवर्णी खांदा साथ देत आहे
त्याच सुगंधाची याद आज आहे...
रूप तुझे असे करे मन दंग
रोमांचित झाले गं सर्व अंगांग
चंद्रमुखी तुझी आस आज आहे
त्याच सुगंधाची याद आज आहे....
चंदनी काया धनकेसही धुंद
आप्राची संध्या मनमोही सुगंध
मोह मायाजाळात मी बंद आहे
त्याच सुगंधाची याद आज आहे....
हे भावबंध मज वाटे अगम्य
रम्य तो स्पर्श प्रणयही सुरम्य
गम्य अगम्याचा ध्यास मज आहे
त्याच सुगंधाची याद आज आहे....

