नाते जन्मांतरीचे
नाते जन्मांतरीचे
1 min
468
फुलला सुगंध मातीचा
रंगला रंग प्रीतीचा.
प्रित तुझी माझी,
सांगून जाते नाते जन्मांतरीचे…
चंद्राला साक्षी ठेवून
आकाशाला गवसणी घालून
प्रीतिचा बहर फुलवीते
नाते जन्मांतरीचे कथन करीते
प्रसन्न झाली धरणीमाता
पर्जन्याच्या छायेत..
तसेच मी तुझ्यासवे
नाते जन्मांतरीचे जुळवीते.
तू नुर अकशाचा
मी समुद्र तरंग
माहित नाही कधी
स्थापेल नाते जन्मांतरीचे .
फुललेला गुलाब कोवळा
हाती तू माझ्या दिला..
त्याच क्षणी वाटले
नाते जन्मांतरीचे मिळाले.
तू, आकाशाची निळाई
मी , धरणीची हिरवाई.
बहरू दिगंतात नवलाई प्रितीची.
असे आपुले नाते जन्मांतरीचे