हाय रे दैवा हाय!
हाय रे दैवा हाय!


हाय रे दैवा हाय! काय खेळ खेळलायस!
जिथं कोरोनासारखं संकट आणलेस,
आणि तिथं हा अत्याचार कशापायी….
आमच्यासारख्या तरुणींच्या वाट्याला यावा?
हाय रे दैवा हाय! काय खेळ खेळलायस!
जिथं डॉक्टर आणि वॉर्डबॉय देवमाणसं असतात
त्यांच्याच पैकी कुणी तरी स्वॅबटेस्ट करतंय! (स्त्रियांच्या गुप्तांगामधून जे पांढऱ्या रंगाचे द्रव्य बाहेर पडते त्यालाच स्वॅबटेस्ट म्हणतात)
तुझ्या राज्यात काय हे अनिष्ट घडतंय?
हाय रे दैवा हाय! काय खेळ खेळलायस!
एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती!
आणि तिसरीकडे काय! तर युद्धजन्य परिस्थिती,
काय रे दैवा, तू इतका निष्ठुर कसा?
सांभाळ या तुझ्या संसाराला,
जिथं अनिष्ट कार्य घडतायत,
आणि तुझ्याच उत्पत्तीला नवं वळण लावतायत
तू आहेस म्हणूनच हे जग आहे,
तुझ्या असण्याची जाणीव करून दे…