प्रितीची भरती…
प्रितीची भरती…
मनात काही सांगायचे तसे तुलाही,
शब्द पोटातून ओठात येई पर्यंत
शब्दांचे शब्दच फिरतात.
त्या शब्दांना फुटे न भाषा प्रितीची,
प्रीत तुझी माझी सुंदर असावी,
त्या प्रितीतून खुलावे हे मन ,
अन् त्या मनात माझ्या..
तार तुझी माझी सतार छेडवी.
मन पुलकीत पुलकित होऊनी
तुझ्यासवे ऋणानुबंध नात्याचा,
गंध सर्वत्र पसरावा.
त्या गंधाने आयुष्य सारे मोहून जावे
त्या आयुष्याला अर्थ नवा हा यावा,
ऋणानुबंध या नात्याचा तुटू नये जन्मोजन्मी
प्रीत तू माझी आहेस,
त्या प्रीतीतून खूलावे हे मन
या मनात माझ्या सुंदर चांदणसडे पडावे
अन् मोहून जावे त्या चांदण्याराती !