श्रावण धारा
श्रावण धारा
थेंब थेंब श्रावणजल पडे ओठांवर!
शहारे येती, यौवनी माझ्या!!
प्रेमा तुझ्या झालो मी आतुर!
भावलो मी तुझ्या लिलया!!
टप टप पडती श्रावणधारा!
जलमय झाली ज्वाला!!
आग लागी यौवना!
साद घालतो तुझिया मना!!
श्रावण मासी आल्या, रेशमी जलधारा!
टपोऱ्या थेंबांसोबत, आला सुगंधी वारा!!
पावसाच्या सरींनी, माझा शेतकरी सुखावला!
पशुपक्ष्यांच्या जीवनी, जीवनाचा सुगंध दरवळला!!
माही श्रावणी पर्वणी पावसाची!
तृष्णा भागली जणू आसमंताची!!
बागडू लागले किलबिल पाखरु!
जणू श्रावण सरींनी, बहरला कल्पतरू!!
श्रावण आला, श्रावण आला!
आणलाय चिंब चिंब ओलावा!!
भासतोय मज गारवा!
मला वाटतोय हवा हवा!!
श्रावणी बरसती धो धो धारा!
हिरवा शालू परिधान करी धरा!!
प्रेमी जुगलबंदी म्हणे!
चिंब चिंब भिजू दे आम्हा!!
किलबिल गोपाला!
श्रावणमासी हर्ष जाहला!!
नाचु लागले किलबिल सारे!
मयुर नर्तकी झाला बरे!!

