STORYMIRROR

प्रशांत पवार

Romance

3  

प्रशांत पवार

Romance

त्या दिवशी अचानक

त्या दिवशी अचानक

1 min
251

त्या दिवशी अचानक

स्वप्नात आली कुनी

केस होते मखमळी

अंगाने ही गोरी..


पाहुन ती हसली

लाजली हळूच गाली

उठून दिसत होती

तिच्या गालावरची लाली..


भिरभिरती बट तिची

गालावर रेंगाळत होती

कापाळावरी मध्ये तिच्या

चंद्रकोर चमकत होती


कसा सावरु मी स्वतःला

नजर काही हटत नव्हती..

ती ही वेडी घिरट्या घाली

माझ्या भवती भवती


सावरुन मग स्वतःला

विचारले नाव तिचे...

हसुन गाली हळुच म्हणाली

तुम्हीच तर सौभाग्य माझे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance