मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती...
मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती...
मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती..
मला रात्रीच्या अंधाराशिवाय काहिच मिळाले नाही..
मी तो अंतरा आहे ज्याला प्रेम मिळाले नाही..
तो प्रवाशी आहे ज्याला मुक्काम मिळाले नाही..
जखम मिळाले मला, बहाराची आशा होती...
मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती..
कुणा परक्याचा, आसरादेखील नाही..
वाटेवर एखादा पुसटसा तारादेखील नाही..
माझ्या नजरेला नजरेची आशा होती..
मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती..
माझ्या वाटेवरुन वेगळी झाली वाट तिची..
आज बदलली दिसते मला नजर तिची..
जिच्याकडून हृदयाने शहार्याची आशा केली होती..
मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती..
प्रेम मागितले तर समोरुन विनंती आली..
सुख मागितले तर मोठी वादळे आली...
बुडणार्या हृदयाने किनार्याची आशा केली होती..
मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती..
हृदयात नाकाम इच्छांचा निवास सापडला..
उजेडासाठी फ़िरलो अन् अंधार सापडला..
मी फ़क्त सुखाची आशा केली होती..
मी तर चंद्र तार्यांची आशा केली होती...
