पाऊस म्हणजे
पाऊस म्हणजे
पाऊस म्हणजे..एक आठवण..
तू सोबत असताना..कोसळणार्या सरींची...
पाऊस म्हणजे..एक साठवण...
तुझ्या सोबत भिजलेल्या..त्या चिंब क्षणांची...
पाऊस म्हणजे..उमललेले फ़ुल...
त्याच्या प्रत्येक थेबाने..जे तुझ्या केसात फ़ुलले होते...
पाऊस म्हणजे..एक प्रीत..
त्याचा येण्याने जी..तुझ्या माझ्या हृद्यात फुलली होती..
पाऊस म्हणजे..एक नातं..
तुझ्या माझ्या मनात..जे नेहमी फ़ुलतं राहतं

