STORYMIRROR

Sanjay Gurav

Abstract

3  

Sanjay Gurav

Abstract

मनाचा आरसा

मनाचा आरसा

1 min
204

मनाच्या कप्प्यात सहज सामावला

तो...

सगळेच कसे आता माझ्या हिश्श्यात

नाहीच उरले स्वासस्य आता,

अगदी कश्श्या कश्श्यात...


प्रेम तर ओसंडून करतो

पण खूपदा गुश्श्यातच असतो

त्याचा आरसा तर मीच म्हणे,

पण तो..

आरश्यात का दिसत नाही..?


नसला जरी मला सोडून फारश्यात

ओझरताही भेटू नये का वर्षात?


झटकून धूळ लख्ख केला आरसा

अंदाजही लागू देत नाही हा फारसा

मनाचा मनावरचा दोलायमान भरोसा

उजेड नसला तरी पुरतो ना...

एक तरी कवडसा?


जरी तो आताशा

आरश्यात दिसत नाही

मला मात्र माहितीआहे,

मनाचा आरसा कधीच

झूठ बरं असत नाही.

कारण मनातलं एखादं गुपित

आरश्यातही फसत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract