STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

त्याग

त्याग

1 min
557

जीवनात उपभोग्य वस्तूच

असतील जरी खूप काही |

त्यातही महत्व जास्त त्यागाचे

मानवा तूच शोधून पाही | | १ | |


त्याग हा हीरा शोभा आणतो

संत महात्म्यांच्या चारित्र्यास |

भोगवृत्ती वासनेच्या आहारी नेऊन

आमंत्रित करीते दारिद्र्यास | |२| |


आळस, भोगवृत्ती नि कुविचारांचा

प्रसंगानुरूप त्याग हवा करायला |

निरंतर समाज सेवा, संतसंग अन्

सुविचारांचा हात हवा धरायला | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract