STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Abstract Inspirational

3  

SANGRAM SALGAR

Abstract Inspirational

काॅलेज कट्टा

काॅलेज कट्टा

1 min
174

आजही आठवे कॉलेजचा दिवस पहिला

सगळेच पाहता नवे चेहरे

अनोखे दृश्य ते पाहता नवल वाटले मजला

सृष्टी पाहता फर्गुसनची मुख झाले हसरे

ना होतं बंधन गणवेशाचं

विद्यार्थी जणू रंगीबेरंगी फुलपाखरे

पण नकळत ओझं मात्र वाढलेलं दप्तराचं

शिक्षणपद्धती जशी की लक्षवेधी करे

आकर्षण वाटे त्या इमारतींचं

मित्रांसंगे तरूही बनती सोबती

गप्पा रंगती भान राही न वेळेचं

प्रत्येक क्षणी कट्टा नवा अनुभव देई हाती

ना तिथे तुलना जाती-धर्माची

प्रत्येकजण जपतो सांस्कृतिक वाटा फर्गुसनचा

जिथे नाती जुळती आपोआप हृदयाची

हाच आहे आमचा कट्टा कॉलेजचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract