STORYMIRROR

ashok sadawarte

Abstract

3  

ashok sadawarte

Abstract

अस्तित्व माझे

अस्तित्व माझे

1 min
173

 आभाळाचे एक बिंब 

विशाल काळाचे एक टिंब 

अथांग जलाचा एक थेंब 

       अस्तित्व माझे ......।


संकटातला एक क्षण 

पृथ्वीतला एक कण

 काळोखातला एक किरण          

      अस्तित्व माझे .......।


क्षणभंगुरतेत एक आस 

सर्वव्यापी हवेचा एकच श्वास 

दरवळतेचा एक सुवास 

     अस्तित्व माझे ...।....


अंधारातून एक पहाट 

भूलावणारी एक वाट 

तरी जगणे असे मुकाट 

     अस्तित्व माझे......।


 सकळांसाठी एक जीवन 

अस्तित्वाचे एक मरण 

मानव्याचे एक आचरण 

    अस्तित्व माझे......। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract