STORYMIRROR

ashok sadawarte

Tragedy

3  

ashok sadawarte

Tragedy

हळवे मन

हळवे मन

1 min
388

नको मना स्मरू आता अंत्य

उत्सवाचे सोहळे ,

नको रित्या आठवणी

त्याचे भान उतावळे...।


नको आलिंगन रुष्ट

अवशेष भग्न साठवांचे ,

साळसूद ठरे आस

घेता नाव आठवाचे ....।


नको फेर मुग्ध साज 

झरत्या सरीचा ,

उपयोग काय जगी

आभासी परीचा ....।


जिथे क्षण मांगल्याचे

अनुभवीत होती मिजास 

प्रकाशाचे गंध संभार

हुलकावी अतिविश्वास ....।


सरे उमेद उरे भास 

कालच्या झडीचा ,

मांडूनिया मोडतो डाव

मीच माझ्या रडीचा .....।


कुणी पुरवावे का

चोचले अर्तकांंचे

रहाटीत कोण इतक्या

हळव्या भावनांंचे.......।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy