स्त्री
स्त्री
एकविसाव्या शतकातील स्त्री
प्यार तू ,यार तू
जगाचा संसार तू ।
सार तू ,संस्कार तू
विश्व निर्मिती साकार तू ।
साज तू ,लाज तू
उंबरठ्याचा आद्य रिवाज तू ।
काल तू ,आज तू
शील संस्कृती समाज तू ।।
आर तू ,पार तू
तलवारीची धार तू ।
वार तू ,तार तू
दुष्ट कुकर्माचा संहार तू ।।
सबल तू ,दुर्बल तू
मानसिक गुलामीत हतबल तू। चंचल तू ,निश्चल तू
दुःखात धीरोदत्त हिमाचल तू।।
जिजाई तू ,रमाई तू
सावित्री ची कमाई तू ।
जनाई तू , मुक्ताई तू जन्मोजन्मीची आई तू ।।
स्फूर्ती तू ,कीर्ती तू
मांगल्याची आरती तू ।
कृती तू ,पूर्ती तू
मने ते जळणारी पंचारती तू।।
दामिनी तू ,सौदामिनी तू
उंच भरारी विमानी तू ।
कामिनी तू ,भामिनी तू
एव्हरेस्ट शिखर अस्मानी तू।।
उत्कर्ष तू ,संघर्ष तू
चराचराचा सहर्ष तू ।
शीर्ष तू ,आदर्श तू
तान्हुल्या मायेचा स्पर्श तू ।।
सार्थ तू ,कृतार्थ तू
जीवित्वास देते खरा अर्थ तू।
पार्थ तू ,मतितार्थ तू
अमूल्य तिजोरीतला अर्थ तू ।।
स्वार्थ तू ,परमार्थ तू
शूरवीरांचा पुरुषार्थ तू ।
शर्थ तू ,दिव्यार्थ तू
जगण्याचा काव्यार्थ तू ।।
आग तू ,जाग तू
मानवी अस्तित्वाचा समभाग तू। राग तू ,त्याग तू
नाहिस नुसता भोग तू ।।
शान तू ,सन्मान तू
न्याय कल्याणाची जाण तू।
भान तू ,कोण तू ?
अपरिचित सूर्य-किरण किरण तू।।
