नकली स्वातंत्र्य
नकली स्वातंत्र्य
ना इज्जतीन भागे
दोन सांजेची भूक
मागे दारोदारी हात
शिळ्या तुकड्याचे सुख
गाजे अमृतमहोत्सव
स्वतंत्र भारताचा
नग्न अर्धपोटी असंख्य
फोडती टाहो जगण्याचा
ना हक्काचे छत
ना वस्त्र अंगभर
कुठले आरोग्य शिक्षण?
जगणे पशूहीन बत्तर
चार पैशांची भीक
शोधी व्यसन सहारा
चोर पोट खळगी
हर दिन तोच फेरा
जिथे महाल गाडी ऐश
भोग कमाईची हाव
शासन नावाखाली
साले चोर झाले साव
नसे मूलभूत योजना
पोकळ फालतू बोंबा
फक्त कल्याण बडेजाव
जगी मिरविती टेंभा
आतून लुटीचे पक्ष
उद्योगा वाटती खैरात
अशा लुचाट लोकांची
नंगि काढावी वरात
काय म्हणून आम्ही
ह्यांना मालक मानावे
अशा नकली स्वातंत्र्यावर
वाटते शंभरदा मुतावे
