निसर्ग वरदान
निसर्ग वरदान
आज मानवा वरदान लाभले रे
पंख पाचूचे जीवना लागले रे.....।।
वृक्ष लतांनी फुले ताटवा
गंध दरवळे पसरे गारवा
हिरवाईने तनमन गुंतले रे.........।।
कडेकपारी झरती निर्झर
नाद मंजुळी मुग्ध चराचर
गिरी सरिता स्वर्गसुख वाहिले रे........।।
गंध फुलांचा मकरंद पिऊनी
मुक्त उडावे रंगछटा लेवुनी
सप्तरंगानी अंग अंग माखले रे.........।।
नवनीत जगणे देतसे रवी
शितल चंद्रमा सुख स्वप्ने सजवी
रत्न चांदण्यांनी विश्व हे भारले रे........।।
राखी सुधांशु अगाध खजिना
शिकवी माणसा जीवनसाधना
सृष्टीने हे भवचक्र तारीले रे............।।
