STORYMIRROR

ashok sadawarte

Tragedy

3  

ashok sadawarte

Tragedy

बाबा तुम्ही असते

बाबा तुम्ही असते

1 min
119

बाबा तुम्ही असते तर 

जिंकली असती समता बंधुतेची लढाई ,

न्याय स्वातंत्र्य नितीमुल्याने ,

केली असती विभाजकावर चढाई.


 बाबा तुम्ही असते तर

 रुजला असता राज्य समाजवाद,

  बहुजनाच्या कल्याणासाठी 

  उरला नसता कुठलाच वाद.

  

  बाबा तुम्ही असते तर 

  झाला असता भारत बौद्धमय.

   प्रज्ञा करुणा मैत्री शीलाने,

   सुखी समृद्ध जन धम्ममय.

    

 बाबा तुम्ही असते तर 

 उद्योग शेतीचे झाले असते राष्ट्रीय करण,

 असते कष्टकरी शेतकरी आनंदी ,

 सहकार तत्वाने मिळते सर्वांना तारण.

  

 बाबा तुम्ही असते तर,

 द्रढ झाली असती सामाजिक आर्थिक लोकशाही,

  घालून भांडवलशाहीला लगाम 

  पुसली असती छुपी घराणे आणि राजेशाही .

  

बाबा तुम्ही असते तर

 विकली नसती मत आणि पत

  एक मत एक मूल्य ची प्रतिष्ठा 

  झाली नसती अशी बाजारू औरत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy