मोकाट जनावर घुसले...
मोकाट जनावर घुसले...
बघवत नाही हो नापरीचे कारण असले
गावात आज समाजकारण नावावरून मोकाट जनावर घुसले
ग्रामपंचायतीची रंगत चालू आहे आज
चौकाचौकात पाहतो भुकेल्या डुकरांचा माज
विचारधारा पेरनारा कुठेतरी आज् कमी दिसतोय
इच्छा मनाची डांबून तत्ववादी लांडगा साडी नेसतोय
विकासाची पाऊले चुल्ह्यात मुंडक घालून बसली
गादीची ताकद मिळता अनोळखी कुत्र्याची जात कसली
सुखाने नांदू द्या चार घर ह्यात राजकारण कसल
समाजकारण नावाच फुलपाखरू आज दुर्गंधीत विचारात रुसल...
