जीवन एक संघर्ष!
जीवन एक संघर्ष!
जीवन एक संघर्ष!
जीवन एक संघर्ष,
जन्मताच पर्यावरणाशी जुळवून घ्यायचा,
उबदार सुरक्षित मायेतून,
जीवनाच्या कठीण सत्याशी टक्करायचा!
जीवन एक संघर्ष,
पुढच्या आयुष्यासाठी,
आत्ताचे निर्वाज्य आयुष्य घालवायचा,
सुशिक्षिततेचे प्रशिक्षण घेऊन,
सुसंस्कार मिळवायचा!
जीवन एक संघर्ष,
सभोवतीच्या घटकांना समजून घेण्याचा,
आपले समजून सांगण्याचा,
पटले नाही तर पटवून घेण्याचा!
जीवन एक संघर्ष,
पदोपदी जुळवून घेण्याचा,
सांभाळत सांभाळत जगण्याचा,
दबकत दबकत चालण्याचा!
जीवन एक संघर्ष,
मागच्यांना सांभाळायचा,
पुढच्यांना प्रेरणा द्यायचा,
आणि एक घट्ट वीण,
जवळच्या आणि लांबच्यांची,
आपल्या आयुष्याशी निगडित
सर्व गोतावळ्याची!
जीवन एक संघर्ष,
रंगांचा, अनुबंधांचा,
कुणी पुढे जाण्याचा,
कुणी मागे रहाण्याचा!
जीवन एक संघर्ष,
विचार आणि आचारांचा,
कृती आणि कल्पनांचा,
अमूर्त राहिलेल्या स्वप्नांचा!
