STORYMIRROR

Jaya Kurhekar

Others

3.6  

Jaya Kurhekar

Others

ओढ पावसाची !

ओढ पावसाची !

1 min
204


संथ कृष्णामाईला, ओढ पावसाची,

खेळकर काठांवरती, उधाणल्या वादळाची!

सागर किनाऱ्यांना, ओढ पावसाची,

छम छम नाचणाऱ्या, लाटांच्या नर्तनाची!

तहानलेल्या मातीला, ओढ पावसाची,

तृषार्त शोषित मृदाला, मृद्गंध हुंगण्याची!

उन्हात रापल्या बागेला, ओढ पावसाची,

रंग उधळणाऱ्या, गंधीत पुष्प कुसुमांची!

नभात विहरणाऱ्यांना, ओढ पावसाची,

सप्तरंगी धनुच्या, इंद्रधनुवर झूलण्याची!

राबणाऱ्या कास्तकाराला, ओढ पावसाची,

खरखरीत मेहनतीला

, पालवी अंकूरण्याची!

चिंतीत माऊलीला, ओढ पावसाची,

तहानलेल्या जीवांच्या, मुखी अमृत बरसविण्याची!

निसर्गात विहरणाऱ्या प्राण्यांना, ओढ पावसाची,

ऐश्वर्याने बहरून झुलणाऱ्या, हिरवाळल्या वनराईची!

क्षीण, दीन ओढ्यांना, ओढ पावसाची,

विरघळल्या हिमनद्यांना, दरडावरून कोसळण्याची!

दमल्या पृथ्वीमातेला, ओढ पावसाची,

ओरबाडल्या निसर्गाला, पुन्हा वसविण्याची!

नटली हिरवी निळाई, तिला ओढ पावसाची,

शृंगारित सलज्ज धरणीला, सय क्षितीज मिलनाची! 


Rate this content
Log in