STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Abstract Tragedy

3  

अमोल धों सुर्यवंशी

Abstract Tragedy

उपकार लय झाले राव 😰

उपकार लय झाले राव 😰

1 min
238

उपकार लय   झाले राव 

ये आज हिशोब करतो

पेन वही नको... 

रक्ताने भागलेलेल्याना वजा करत जातो 

रडनार नाही मनगटाने गुणत राहतो 

तुम्ही दिलेली भीक त्याची बेरीज करतो 

बस झालं, ये आज तुझा हिशोब करतो !!


फुकट फिरणारा फकीर नाही मी 

नशिबावर विश्वास ठेवणारी लकीर नाही मी 

गोम्या सोम्याच्या मागे लागत नाही मी 

मी माणुसकी आणि परिवार जपतो 

ये ना आज तुझा हिशोब करतो... !


तुझा ओझ्याने माझी मान वाकली 

ही मोडलच कशी? या मानेन, 

डोंगर दऱ्यातून लाकड वाहिली.. 

तुझ्या  तोंडाची तलवार,

 तू चालवत गेलास,  खूप अणीवर.. 

ये, तू येणार नाहीस माहित आहे, 

तरी तुझा हिशोब करतो. 

उपकार खूप झाले राव.. 


बघूया काय होतंय ते.... 

मी माझा परस्थितीशी लढतो 

की तू तुझा खोट्या षडयंत्रा मध्ये अडकवतो.. 

भेटून तूला हिशोब बरोबर करतो.. 


माझा वाटचाली मध्ये खूप संघर्ष आहेत 

मला कोणावर राग आला की स्व:ताशी भांडत असतो 

ये मना आता तुझा पण हिशोब करतो... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract