STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Romance Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Romance Tragedy

जीव तुझ्यात रंगला

जीव तुझ्यात रंगला

1 min
300

सांगतो मी तुला सखे

जीव तुझ्यात रंगला...

या राजाची तू ग राणी

करु संसार चांगला...


प्रितीत दोघं न्हाऊ

जन्मोजन्मी साथ देऊ,

केला अर्पण जीव तुला

काय हवा गाडी,बंगला...


दिन रात मी झुरतो

नवस तुझ्यासाठी करतो,

तडफडतो माझा आत्मा

जीव तुझ्यासाठी टांगला...


राधा,सिता,रुख्मिणी,पार्वती

लैला, हिर,सावित्री, दमयंती

सर्वस्व माझं तू ग

तुच माझी मंगला...


दावू जगा आपली प्रीत

पतीपत्नीचं आदर्श नातं,

होऊ अमर दोघं जगी

देऊ आदर्श जगा चांगला...


तुझ्याविना जगावं कसं

तूच जगण्याची आस,

तूच जीवन मरण माझं

जीव तुझ्यात रंगला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract