छबी टिपू मनाच्या कप्प्यात
छबी टिपू मनाच्या कप्प्यात
वृक्षलतांनी बांधली कमान
घरात जसा खिडकीचा मान
केशरी सड्यात सजले नभांगण
झाडांच्या जाळीत उदयाचे किरण.
सकाळचा प्रहर हरपे भान
निसर्ग पाहून व्हावे बेभान
उत्साहाचे गावे नवे गान
नाविन्य आसमंती नाचे तनमन
केशरी लाल होई आसमंत
चराचराला करी जागृत
मांगल्य ऊर्जा दिवसारंभीची
फुले चैतन्य झरा रगारगात
चिवचिव किलबिल होई रानात
मंजूळ गप्पा नभी बागडत
शुभदिन संदेश उरी साठवत
छबी टिपू मनाच्या कप्प्यात.
