वेश्या
वेश्या
बाई तुझ जगणं बाभळीच्या काट्यावर
ठेकेदारांची नजर वाटवकाऱ्यावर
मस्त झुरके घेत रंडी उभी ठेल्यावर.
नालायचे किडे पंगू होहून छाताडावर
धस्त गेली पोळवाट कसाला हा आधार वाऱ्यावर
हा अब्रू रहित समाज आहे हा,
फेकून देतात नाळ्यातली नस्ल उखीट्यावर
सभ्य नाही कोणी त्या वस्तीतून
येणार जाणारा रक्ताने माखलेला,
चांगुलपण दाखवून शरीरासाठी हापापलेला
जो तो येतो.
मेल्याल्या मूडद्यामध्ये आकर्षनाची लाळ सांडायाला
पापी पोटा इजतची जत्रा भरते उभ्या रस्त्याला
पोटाची भूक, शरीरच्या लचक्याने मिटवयला
घराची चूल स्वतःला उभी जाळून पेटवत्या..
हृदय विकलंय बिन पैसाच आता शरीर विकत्या.
नसात भरून ठेवल्यात आईने धंद्यात प्रेमनद्या रित्या.
आता उलट्या बुडावर कलश उभा करत्या.
डोळ्याने शेकणारे लिपटून जातात.
कामासाठी येतात काम झालं की निघून जातात.
रात्री काय? दिवसा काय?
हिते रोज प्रेमाचे नवरंग बदलतात...
चरित्र शुद्ध भाऊ भाव करून विकत्या
धोक्का देऊन दिखावा नाही करत..
रंडी रंडी म्हणून जगत्या...
