लहानपणीचे चे खेळ
लहानपणीचे चे खेळ
पाऊस सुरु झाला की..
आठवतात लहानपणीचे चे खेळ..
आईची नजर चुकवून..
पावसात भिजायला जायचे...
वाहणार्या पाण्यामागे..
कागदाच्या होड्या घेऊन धावताना...
पाय घसरुन पडलेले ते क्षण...
कितीही चिखलात माखलो तरी...
ध्यास फ़क्त आपल्या होडीला...
काही करून हरु द्यायचे नाही..
अंगावरच्या कपड्यांवर चिखलाने..
विविध राष्ट्रांचे नकाशे तयार झालेले...
चेहर्यावरुन पावसाचे थेंब ओरघळत...
सर सर सर सर खाली येताना...
एका हाताना त्यांना पुसुन...
पुन्हा नवीन होडी घेऊन पलत सुटायचे...
