STORYMIRROR

प्रशांत पवार

Abstract Comedy Fantasy

3  

प्रशांत पवार

Abstract Comedy Fantasy

थेंबाला ही लागली थंडी

थेंबाला ही लागली थंडी

1 min
116

वसंत ऋतूच्या आगमनाने...

निसर्ग फ़ुलुन आलेला...

वारा वेडा इकडे तिकडे...

ढगां सोबत खेळू लागला...

खेळता खेळता वारयाने...

ढगाला दिला एक गुद्दा...

ढग बिचारा डोळे भरुन...

रडू लागला ढसा ढसा..

ढगांचे अश्रू खाली उतरुन....

रपरप रपरप वाहू लागले...

पाऊस आला पाऊस आला...

सारी मुलं खेळू लागले...

पावसाच्या एका थेंबाला...

धरतीचे हरीत फ़ार आवडले...

तिथेच एका पानावर... 

त्याने राहायचे ठरवले...

पावसाला हळू हळू..

गेला होता सरुन..

थेंब मात्र पाहत होता..

त्याला गपचूप दुरुन..

हिवाळ्याचे वारे आता...

लागले होते वाहू...

थेंब बिचारा काळजीत...

आता मी इथे कसा राहू...

असाच एकदा थंडीने..

केला खुप कहर ...

थेंब बिचारा गारठला...

कापू लागला थर थर....

हिवाळ्याच्या त्या दिवसाने..

खेळला डाव षंडी..

पावसाच्या त्या थेंबाला

ही लागली कडकडून थंडी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract