असू द्यावी ओळख सत्याची
असू द्यावी ओळख सत्याची
असू द्यावी ओळख सत्याची
डावलू नका तयासी
ज्या नावेत बसलात
तया महत्व असू दयावं,
मनात कुठे, !!1!!
भंवर खोट्याचं
अशांत करत सागर
वादळं वाऱ्याच मूळ
काहीच क्षण फडफडतं, !!2!!
कोण कुठे कसं जगत
हे नसे बां महत्वाचं
आनंद कुठेही दडलेलं
बसं ते शोधायचं असतं, !!3!!
गुरु तर गुरुच असतं
स्वार्थाला सोडून
सर्वांचं चांगल व्हावं म्हणत
हीच खरी सिख संसारात, !!4!!
वल्हे बनवून नेते
संसार सागरात
नावं सर्वांचीच तरते
किनाऱ्याचा प्रयत्नात, !!5!!
पण येथे काठचं नसतं
फक्त समाधानाची साथ
मानलं तर मिळतं
किनाऱ्यावर असल्यासारखं, !!6!!
महत्व असू द्यावं वास्तवितेला
ढोंग भंडाऱ्याचं का करता
दीनदुबळ्यांना घास द्यावं
हेच पुण्याचं खरा यज्ञ, !!7!!
स्वार्थाचीच नावं पण
मदतीचा भाव असावं
एकतेचाच गाडा खरा
सर्वतेचा सार
मजबुतीचा आधार..........
---------*****-------*****---------
