Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

स्वप्नं

स्वप्नं

1 min
240


स्वप्नं पहावी , उघड्या डोळ्यांनी 

परिस्थितीचे , भान ठेवूनी

क्षमता पहावी , नीट तपासूनी

आवाका किती , घ्यावे ध्यानी


स्वप्नांचे आकाश , रम्य तरल

दीर्घ प्रयत्नांचा , असे प्रतल

जिद्द कसोटी कष्टांचा संगम

साकारिती स्वप्ने , कुंचला प्रबल


कधी होईल , विचका अचानक

भंगेल स्वप्न , असेच खळकन्

सावर रे तू , मनुजा चटकन् 

घेई उभारी , वेचूनी कण कण


थांबला तो संपला , जाणूनी

कोळ्यापरि , जाळे विणूनी

मुंगीपरि , कण कण वेचूनी

जावे ध्येयाप्रती , पुढे चालूनी


प्रयत्नांती , परमेश्वर असतो

ध्येयपूर्तीचा , आनंद असतो

यशस्वी , स्वप्नशिल्प घडवितो

तोच वास्तव , जीवन जगतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract