STORYMIRROR

Uddhav Bhaiwal

Romance

3  

Uddhav Bhaiwal

Romance

देवाणघेवाण

देवाणघेवाण

1 min
185

जीवनाच्या वाटेवर

सुख-दु:खाची उभी रांग

सर्वच सहन करीत

तुझ्याबरोबर मी उभी आज

चुकले माझे काही

चुकले तुझे काही

दोघांनीही सांभाळले एकमेका

विचारांची देवाणघेवाण करून

दोघेच आपण एकमेका

सोडू नकोस केव्हाच साथ

देवा तूही वेगळे करू नकोस आम्हा

हीच शेवटी तव चरणी प्रार्थना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance