तू...
तू...

1 min

174
झोपेमध्ये असशी तेव्हा सुंदर किती दिसशी
स्वप्नामध्ये दंग होऊनी मंद, मंद तू हसशी
कर्णफुलांनी कान हे सजले, छान किती दिसती
गाली तुझिया बटा खेळती, भुरळ मज घालती
चमकदार ही तुझी मोरणी, मस्त किती दिसते
भाग्य तिचे ते थोर किती, तव नाकावर वसते
गळ्यातील हे गंठण तुझिया अंगावर रुळते
झोपेमध्ये असशी तेव्हा अतीच चमचमते
हातातील हे सुवर्ण कंकण शोभून तव दिसती
पायी पैंजण झोपेतही किणकिण ते करिती
ओवाळुनी मी जीव टाकितो तुझ्यावरी आता
अंत होईतो साथ देई मज, समजून घे आता