कवितेची मनधरणी
कवितेची मनधरणी

1 min

211
मनात आता न कुठलेच भाव
नव्या कवितेचे नाहीच नाव
कविते उमल तू मनात थेट
त्वरेने घेईन तुझी गळाभेट
मारीन तुला कडकडून मिठी
रूप ते गोजिरे साठवीन दीठी
चोरपावलांनी हळू तू ये ना
माझ्या मनाचा ताबा तू घे ना
तुझी नी माझी गमाडी गंमत
कुणालाच नाही मी सांगणार, शप्पत
रात्रीच्या या वेळी फुलव पिसारा
किती शांत शांत हा आसमंत सारा
कविते ये आता, खाऊ नकोस भाव
थोड्या वेळाने हा जागा होईल गाव