घालमेल
घालमेल
1 min
171
वाऱ्याच्या वेगाने मन माझे धावे
शरीराची मात्र होई संथ हालचाल
मन क्षणात करते पृथ्वी प्रदक्षिणा
चालतांनासुद्धा शरीराचे होती हाल
शरीराची चाल आणि मनाची गती
मेळ काही या दोहोंचा बसतच नाही
काय करू, कसे करू, सुचतच नाही
मनाची घालमेल ती थांबतच नाही
